मुंबई चा आवाज

मराठी | हिंदी | English


‘मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर’ - विकेंद्रीकृत, नागरिकांद्वारे पडताळणीयोग्य यंत्रणा एखाद्या क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कमी करू शकतो

हा लेख वाचण्यापूर्वी, जर तुम्ही याअगोदर वाचला नसेल तर या लिंकमधील लेख वाचून घ्या - तुमच्या समस्यांसाठी जनहिताय उपाय मिळवण्यासाठी, तुमच्या लोकप्रतिनिधीकरिता, तुमच्या मतदार क्रमांकासह जाहीर सूचना प्रदर्शित करा

‘लोकप्रतिनिधीस कायद्याच्या मसुद्याची लिंक आणि Sha1 फाइल हॅश सह एसएमएस/ट्विटर आदेश’ मोहीम पद्धती - एखाद्या क्षेत्रातील सार्वजनिक एसएमएस सर्व्हर त्या क्षेत्रातील गुन्हेगारी कमी करेल

१. मतदार क्रमांक / पत्ता सार्वजनिक मत सर्व्हर म्हणजे काय?

‘मतदार क्रमांक / पत्ता सार्वजनिक मत सर्व्हर’ म्हणजे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, जिल्हा/तहसील/ग्राम सरपंच, जिल्हा/तहसील/ग्राम पंचायत सदस्य इ. लोकप्रतिनिधी या आणि count.recallbytweet.com या साइटसारखी एक साइट तयार करतील. लोक त्यांची सर्व मते एसएमएस, ट्विट इ. मार्फत त्यांच्या मतदार क्रमांकासह किंवा पत्त्यासह लोकप्रतिनिधीच्या अशा वेबसाइटवर प्रदर्शित करू शकतील. मते आणि मतदार क्रमांक सर्वांन दिसतील. त्यासाठी लॉगिन करायची गरज लागणार नाही.

आपण प्रत्येक खासदार, आमदार, नगरसेवक, इ. लोकप्रतिनिधीकडे आणि मागील निवडणुकीतील उमेदवारांकडे त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या मतदारसंघातील पुढील निवडणुकीआधी `मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर` तयार करण्यासाठी एसएमएस किंवा ट्विटर इ. मार्फत विचारणा करायला हवी. कारण सत्य हे आहे की `तुमचा खासदार तुमचे बोलणे ऐकू शकत नाही, तो केवळ तुम्हाला मोजू शकतो`.

२. अशा मतदार क्रमांक / पत्ता सार्वजनिक मत सर्व्हरचा नागरिकांना काय लाभ मिळणार?

जर एखाद्या लोकप्रतिनिधीने त्याच्या वेबसाइटवर `मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर`ची सोय केली, तर त्या क्षेत्रातील कोणताही नागरिक या वेबसाइटवर पुराव्याची, विधानाची, इ. प्रत त्याच्या मतदार क्रमांकासह किंवा पत्त्यासह अपलोड करू शकतो. हे पुरावे इ. कोणी डाउनलोड केलेत आणि पुढे त्यांचे वाटप केलेले आहे हे गुन्हेगारांना कळणार नाही आणि त्यामुळे गुन्हेगारांना पुरावे दडपता येणार नाहीत. मत देणाऱ्यांशी इतर नागरिक संपर्क साधून प्रदर्शित माहितीची पडताळणी करू शकतात आणि आणखी माहिती मिळवू शकतात. माहितीचा अस्सलपणा आणि लाभ यांनी समाधानी झालेले नागरिक माहिती पसरवण्याची शक्यता वाढते, अशाप्रकारे, हा ‘मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर’ जिथे राबवला जाईल त्या क्षेत्रातील अनेक गंभीर समस्या सोडवेल आणि भ्रष्टाचार, गुन्हेगारी इ. कमी करेल व त्यासंबंधित समस्याही कमी करेल.

‘मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर’ टीसीपीची, माघारी बोलावण्याच्या अधिकाराची, इ. जनहिताय प्रस्तावांची मागणीसुद्धा करेल, कारण नागरिकांना दिसून येईल की ही चांगली यंत्रणा सहजपणे राबवता येऊ शकते आणि ही देशाच्या समस्या सोडवते. यामुळे नागरिक आणि कार्यकर्ते नेत्यांची आणि पक्षांची अंधभक्ती करणे कमी करतील.

आपण विविध मार्गांनी मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हरची मागणी करू शकतो, उदा. या वेबसाइट्ससारख्या वेबसाइटवरून प्रामाणिक, नागरिकांद्वारे पडताळणीयोग्य यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवणे.

३. ‘मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर’ची संरचना कशी असेल?

‘मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर’ची रचना पुढीलप्रमाणे असू शकते -

कृपया नोंद घ्या की खासदार म्हणजे ‘खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, जिल्हा/तहसील/ग्राम सरपंच, जिल्हा/तहसील/ग्राम पंचायत सदस्य इ. लोकप्रतिनिधी’

१. खासदाराने आपल्या मतदारसंघातील मतदार क्रमांकांची / मतदारांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी करवणे -

(१.१) मतदारांना खासदाराच्या साइटवर नोंदणी करायची असेल, तर ते खासदाराच्या कार्यालयात जाऊन आपला मोबाइल क्रमांक आणि मतदार क्रमांक मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करू शकतात, ज्याची साइटवर नोंदणी होईल.

(१.२) पर्यायाने, मतदार खासदाराच्या सर्व्हर क्रमांकावर *मतदार क्रमांक* एसएमएस करू शकतात. मग खासदाराचे कर्मचारी मतदार यादीत दिलेल्या त्या मतदाराच्या पत्त्यावर पोस्ट कार्डद्वारे ४ अंकी कोड पाठवतील, आणि हा कोड जेव्हा त्या मोबाइलवरून एसएमएस मार्फत ‘मतदार क्रमांक सार्वजनिक मत सर्व्हर’ वर येईल, तेव्हा तो मतदार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक खासदाराच्या साइटवर नोंदणीकृत होईल.

२. खासदाराच्या साइटवर विषय नोंदवणे -

(२.१) मागील विभागात वर्णन केल्यानुसार नोंदणीकृत झालेला कोणताही मतदार त्याची मागणी नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर मांडू शकतो आणि ते 'मेन लिंक' किंवा 'मेन स्टेटस' म्हटले जाणाऱ्या फेसबुक पेजवर किंवा वॉलवर स्कॅन करून टाकू शकतो. मतदाराने फाइल फेसबुक ग्रूपवर अपलोड करावी आणि Sha1File Hash नावाच्या फाइलचे Sha1 hash शोधून काढावे (तुम्ही हॅश जनरेटर वेबसाइटवर फाइल अपलोड करून Sha1File Hash मिळवू शकता. उदाहरणार्थ - http://onlinemd5.com/ ; या लिंकवर जा, Sha1 पर्याय निवडा, फाइल अपलोड करा आणि तुम्हाला ‘File checksum’ नावाच्या रकान्यामध्ये Sha1File hash मिळेल)

मेन (स्टेटस) लिंक मध्ये हे Sha1File hash असेल आणि प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याचा संपूर्ण मजकूर असेल, तसेच फेसबुक ग्रूपमध्ये अपलोड केलेल्या फाइलची लिंक असेल. मतदार खासदार इ. ला एसएमएस पाठवेल ज्यामध्ये मेन लिंक आणि Sha1File hash असेल. जर पाठवलेल्या एसएमएस मध्ये हॅश आणि लिंक नसेल, तर सर्व्हरने असे उत्तर पाठवावे "कृपया लिंक किंवा हॅश असलेला एसएमएस पाठवा. हा सर्व्हर युआरएल किंवा हॅश नसलेला एसएमएस विचारात घेणार नाही"

(२.२) पर्यायाने, खासदाराकडे अशी यंत्रणा असू शकते जिथे मतदार खासदाराच्या कार्यालयात नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र घेऊन जातात, प्रतिज्ञापत्रासह विशिष्ट शुल्क भरतात आणि एक पर्यायी शॉर्ट कोड सुपूर्द करतात. मतदाराला पावती मिळेल, जिच्यावर नागरिकाचा मतदार क्रमांक आणि प्रतिज्ञापत्र क्रमांक असेल.

(२.३) खासदाराचे सहकारी लिंकची किंवा सुपूर्द केलेल्या सामग्रीची छाननी करतील, आणि त्यात काही अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर आहे का ते पाहतील. जर काही आक्षेपार्ह असेल, तर अशा मजकुराच्या जाहीर प्रदर्शनास स्थगिती मिळेल, आणि त्यासाठीचे कारण त्याच्या प्रतिज्ञापत्र क्रमांकासह दाखवले जाईल. काही आक्षेपार्ह नसेल, तर पूर्ण मजकूर दाखवला जाईल. जर खासदाराकडे (२.२) मध्ये उल्लेखित यंत्रणा असेल, तर सुपूर्द केलेल्या दस्तऐवजाची अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर शोधण्याकरिता छाननी होईल, आणि जर काही आक्षेपार्ह आढळले नाही, तर ते प्रतिज्ञापत्र स्कॅन होऊन खासदाराच्या वेबसाइटवर संबंधित नागरिकाच्या मतदार क्रमांकासह अपलोड. केले जाईल. लपवलेल्या मजकुराची कागदी प्रत खासदाराच्या कार्यालयात जतन केली जाईल.

३. खासदाराच्या साइटवर अगोदरच नोंदणीकृत असणाऱ्या विषयांवर एसएमएस मार्फत दिलेले किंवा खासदाराच्या कार्यालयात दिलेले मत -

(३.१) एखाद्या क्षेत्रातील मतदार त्यांची मते खासदाराच्या वेबसाइट सर्व्हरवर एसएमएस मार्फत सुपूर्द करू शकतात. या एसएमएस मध्ये नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र च्या लिंक्स / Sha1 file hash, किंवा नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र च्या समर्थनासाठी, विरोधासाठी, रद्द करण्यासाठी, स्पॅम किंवा अनस्पॅम करण्यासाठी विशिष्ट कोड्स असू शकतात. स्पॅम्सची संख्या विशिष्ट पातळीवर पोहोचली, तर खासदार संबंधित दस्तऐवजातील मजकूर लपवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अनस्पॅम्सची संख्या विशिष्ट पातळीवर पोहोचली, तर खासदार त्याच्या वेबसाइटवरून लपवलेल्या दस्तऐवजातील मजकूर दाखवण्याचा निर्णय घेऊ शकतो. खासदाराचा निर्णय अंतिम असेल.

याचे तपशीलवार स्पष्टीकरण उदाहरणासह इथे पाहा mumbaichaawaz.com/marathi/urlcount.php

(३.२) पर्यायाने, खासदार अशी यंत्रणा राबवू शकतात जिच्यामध्ये मतदार खासदाराच्या कार्यालयात जातात, विशिष्ट शुल्क भरतात, त्यांचा मतदार क्रमांक दाखवतात आणि एखाद्या नोंदणीकृत लिंक/हॅशवर त्यांचे मत देतात

४. खासदाराच्या साइटवर त्याच्या मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या मतांचे प्रदर्शन -

(४.०) खासदाराच्या साइटवर २ विभाग असू शकतात – (अ) ‘नोंदणीकृत’: अशा मतदारांसाठी ज्यांनी त्यांचे मतदार क्रमांक खासदाराच्या साइटवर नोंदवलेले आहेत, आणि (ब) ‘नोंदणीरहित’: अशा मतदारांसाठी किंवा नागरिकांसाठी जे नोंदणीकृत नाहीत.

(४.१) नोंदणीकृत मतदारांकडून आलेली माहिती असणाऱ्या पानावर एक तक्ता असेल ज्यामध्ये अनु क्रमांक, प्रतिज्ञापत्र क्र., लिंक/हॅश, नोंदणीकृत समर्थन संख्या, नोंदणीकृत विरोध संख्या, नोंदणीकृत स्पॅम संख्या आणि नोंदणीकृत अनस्पॅम संख्या यांसाठीचे रकाने असतील. आकडेवारीचे (संख्या) रकाने हायपरलिंक असावेत, ज्यावर क्लिक केल्यावर एक असे पान येईल जिथल्या तक्त्यामध्ये नाव, मतदार क्रमांक, युआरएल/हॅश आणि दिनांक-वेळ यासाठीचे रकाने येतील. विभाग ३.१ मध्ये वर्णन केल्यानुसार, ॲडमिनने ठरवल्यास, स्पॅम झालेली लिंक/हॅश कोड अंशत: लपवता येऊ शकतात.

याचे उदाहरण इथे पाहा mumbaichaawaz.com/marathi/urlcount.php

(४.२) नोंदणीरहित मतदारांकडून/नागरिकांकडून आलेली माहिती असणाऱ्या पानावर एक तक्ता असेल ज्यामध्ये अनु क्रमांक, प्रतिज्ञापत्र क्र., लिंक/हॅश, नोंदणीरहित समर्थन संख्या, नोंदणीरहित विरोध संख्या, नोंदणीरहित स्पॅम संख्या आणि नोंदणीरहित अनस्पॅम संख्या यांसाठीचे रकाने असतील. आकडेवारीचे (संख्या) रकाने हायपरलिंक असावेत, ज्यावर क्लिक केल्यावर एक असे पान येईल जिथल्या तक्त्यामध्ये पाठवणारा (लिंक/हॅश पाठवणाऱ्या मोबाइल क्रमांकाचे शेवटचे ५ अंक), दिनांक-वेळ आणि युआरएल/हॅश यांसाठीचे रकाने असतील. विभाग ३.१ मध्ये वर्णन केल्यानुसार, ॲडमिनने ठरवल्यास, स्पॅम झालेली लिंक/हॅश कोड अंशत: लपवता येऊ शकतात.

याचे उदाहरण इथे पाहा mumbaichaawaz.com/marathi/urlcount-unregistered.php